गणपतीपुळे

गणपतीपुळे 



ऊँ नमो विघ्नराजाय सर्वसौख्यप्रदायिने।
दुष्टारिष्टविनाशाय पराय परमात्मने॥

देश

भारत

राज्य

महाराष्ट्र

जिल्हा

रत्नागिरी

लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार )

1,236

पिनकोड

४१५६२२

वाहन नोंदणी

MH-०८

भाषा

मराठी

 


ज्याचा नावाच्या सुरवाती पासुनच श्री गणेशाची सुर्वात होते असे हे गणपतीपुळे. मुंबई पासुन सुमारे ३५० कि. मी अंतरावर असलेल्या कोकणा मधील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती मंदिराचा इतिहास सुमारे पेशवेकालीन आहे. खूपच कमी  लोकसंख्या असलेले हे ठिकाण असले तरी खूप प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे एक जागृत देवस्थान आहे अशी मान्यता आहे. तसेच मंदिराला स्वयंभू गणपती मंदिर या नावाने सुद्धा संबोधले जाते. आणि हजारो लोक या मंदिराला दरवर्षी भेट देत असतात. असंख्य लोक इथे नवस देखील करत असतात.

इतिहास : 



प्रत्येक ठिकाणाचा काही ना काही इतिहास हा नक्कीच असतो , आणि त्यात गणपतीपुळे हे धार्मिक ठिकाण आहे. स्वयंभू गणपती मंदिर म्हणजे गणपतीपुळे हे मंदिर सुमारे पाचशे वर्ष जुन आहे. येथील कहानी थोडी वेगळीच आहे असे म्हटले जाते की हे मंदिर कोणी स्थापन केलं स्वतः  भगवान श्री गणपती येथे प्रकट झाले होते. येथे भक्तांना आकर्षित करते ती म्हणजे येथील गणपतीची मूर्ती . याची अजून एक कथा म्हणजे भेटली तरी कशी हा प्रश्न असेलच ना ? या गावाची वहिवाट आधी बाळभटजी भिडे यांच्या हाताखाली होती श्री गणेशाचे खूप मोठे भक्त तसेच त्यांचा देवावर खूप विश्वास होता. एक दिवशी एक गुराखी त्यांच्याजवळ आला आणि त्यांना अशी गोष्ट सांगितली बाळ भटजी भिडेच काय तर पूर्ण गाव आश्चर्यचकित झाले होते. त्या गुराख्याने सांगितले की माझी गाय अनेक दिवस डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका केवड्याच्या शिळेवर दुधाची धार सोडते. हे ऐकून भटजी व गावातले लोकं त्या ठिकाणी जाऊन साफसफाई केली तेथे त्यांना एक श्री गणपतीची मुर्ती सापडली भटजी व तेथील स्थानिक लोकांनी जावळ्याचा आधार घेऊन एक छोटसं मंदिर स्थापन केलं व त्याची पूजा देखील केली. आणि येथुन स्थापना झाली गणपती मंदिराची. पुढे काही वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सरदार अण्णाजी दत्तो यांनी या मंदिराला सुंदर घुमट बांधून दिला व पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी या मंदिराचा सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानाचे कारभारी माधवराव वासुदेवराव बर्वे यांनी देवळाला सोन्याचा मुलामा असलेली घुमताकार कळस चढवला. तसेच येथे रमाबाई यांच्या हस्ते दगडी धर्मशाळा देखील बांधण्यात आली. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली आज आपण या स्थानावर गेलो मंदिराचे दृश्य दिसते ते मंदिर बांधण्यासाठी सुमारे 1998 ते 2003 पर्यंतरचा कालावधी लागला.  हे मंदिर प्राचीन भारतातील स्थापत्य कलेचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून बांधण्यात आले होते.

वास्तूकला : 


लाल आग्रा या दगडाचा वापर करून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून उंच घूमटाकृती गर्भगार आणि सभा मंडपाच्या छतावरील नक्षीकाम याच्यावर सूर्यकिरण पडल्यावर याचा दृश्य डोळ्यांना अगदी भारावून टाकते. मंदिराच्या दक्षिणेस 5 त्रिपुरा आहेत.त्रिपुरा पौर्णिमेला त्यावरचे दिवे प्रकाशमान होता तेव्हा मंदिराची रोषणाई मनाला प्रसन्न करून टाकते. जानेवारी व नोव्हेंबर महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट जाऊन स्वयंभू मूर्तीवर पडतात. पावसाळ्यात समुद्राला उधाण आल्यावर समुद्राच्या लाटा मंदिराला चरणस्पर्श करतात. येथील वास्तू कला खूप आकर्षित आहे आपल्या संस्कृतीची व इतिहासाची‌  आठवण करून देणारी ही वास्तू कला आहे .

समुद्रकिनाऱ्यावरील दृश्य:




समुद्र म्हणजे आपल्या काही भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात. आणि कोकणातील समुद्रकिनारे मनाला वेगळेच मोहित करतात. गणपतीपुळे मंदिराला लाभलेला समुद्र डोळ्यांची नजर न मावणारा इतका लांबलचक आहे. आणि मंदिराची विशेष शोभा हा समुद्र वाढवतो. समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्त व सूर्योदय मनाला प्रसन्न व मोहित करतो. तसेच येथे "नवरा माझा नवसाचा" आणि "फुल टू धमाल" या चित्रपटांनी शूटिंग येथे झालेली आहे. हे स्थळ चित्रीकरणासाठी  सुद्धा खूप प्रसिद्ध आहे


हवामान: 

मार्चनंतर, तापमान वाढू लागते परंतु क्वचितच 30 डिग्री सेल्सिअस ओलांडते. मे हा सर्वात उष्ण महिना आहे, तापमान 40 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते. मान्सून जून ते ऑक्टोबर पर्यंत असतो, जेव्हा पाऊस सहसा भरपूर आणि नियमित असतो.

दर्शनाची वेळ : 

                   

शिवजी के प्यारे लड्डु खा के , मुशक सवारे वो है देवा गणेश हमारे.

येथे लाखो पर्यटक पर्यटनासाठी येतात. दर्शनाची वेळ सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असते. व आरतीची‌ ठराविक वेळ दुपारी बारा वाजता व संध्याकाळी सात वाजता आहे. आरती झाल्यानंतर साडेबारा ते दोन या वेळेत खिचडीचा प्रसाद देखील दिला जातो. प्रत्येक क्षणा दिवशी या मंदिरात खूप जास्त गर्दी असते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पालखी दर्शन संध्याकाळी चार वाजता असते भक्त जणांसाठी प्रत्यक्ष पूजा सकाळी चार ते अकरा वाजेपर्यंत चालू असते.

हॉटेल्स व जेवणाची सोय : 

गणपती मंदिराच्या बाहेर तुम्हाला हॉटेल व जेवणाची सोय आरामात मिळून जाईल.

कसे जायचे ?
स्वतःचे वाहन, ट्रेन, बस, रिक्षा 


बसने : 
तुम्हाला रत्नागिरीतून गणपतीपुळे गाड्या आरामात मिळतील. रत्नागिरीतून सुमारे 25 कि.मी. वर गणपतीपुळे आहे साधारण एक तास तुम्हाला बसने लागेल.

रेल्वेने: 
सर्वात जवळचे रेल्वे स्थानक रत्नागिरी रेल्वे स्थानक आहे.
( मुंबईवरून तुम्हाला सहज रत्नागिरी ट्रेन उपलब्ध आहे. )

खाजगी वाहने: 
तुम्ही तुमच्या खाजगी वाहनाने सुद्धा येथे जाऊ शकता. बाहेर तुम्हाला सहज पार्किंगसाठी जागा मिळेल.

रत्नागिरी जिल्हा पर्यटन : 

  1. भाट्ये बीच
  2. पावस 
  3. सागरी मत्सालय आणि संग्रहालय
  4. मांडवी बीच 
  5. थिबा पॅलेस
  6. गणेशगुले बीच 
  7. रत्नदुर्ग किल्ला
  8. जयगड किल्ला
  9. मालगुंड 
  10. वेळणेश्वर शिवमंदिर
  11. गुहागर बीच
  12. टिळक अली संग्रहालय
  13. जय विनायक मंदिर जयगड
  14. देवगड समुद्रकिनारा
  15. धामापूर तलाव
  16. परशुराम मंदिर
  17. बामणघळ
येवा कोकण आपलोच असा🌴❤️ 

आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नकात !



मला अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करू शकता.
Instagram ID : s_o_n_u_26619

आणि हो youtube ला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. 

YouTube channel : sr's_unique_world

आणि हो इथपर्यंतर येण्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार माहिती आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ❤️🥀


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Kalamb Beach - Nalasopara

सागरेश्वर समुद्रकिनारा - वेंगुर्ला