🌴 सागरेश्वर समुद्रकिनारा 🌴
निसर्गाच्या सानिध्यात असणार व मनाला नेहमी शांत ठेवणार्या ठिकाणांची यादी काढायला घेतली नक्कीच पहिली आठवण येते ते म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जर पुर्ण फिरायच म्हटलं तरी उभे आयुष्य कमी पडेल ! आणि त्या बद्दल लिहायला घेतले तरी पांने आणि शब्द दोन्ही पण अपुरे पडतील. 
नेहमीचं आपण वेगेवेगळ्या ठिकाणानं बद्दल जाणुन घेत असतो पण आज आपण ज्या ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत ते ठिकाण काही फारसे प्रसिद्ध नाही पण याबद्दल अधिक लोकांपर्यंत पोहोचवले तर हे ठिकाण एके दिवशी नक्कीच प्रसिद्ध होईल याची मला खात्री आहे. आज आपण सिंधुदुर्गातील एका ठिकाणा बद्दल जाणुन घेणार आहोत ते म्हणजे सागरेश्वर समुद्र याला वेंगुर्ला समुद्र असे देखील संबोधले जाते. कदाचित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असा एकही व्यक्ती नसेल ज्याला वेंगुर्ला माहिती नसेल कारणही तसेच आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आणि मनाला प्रसन्न करून टाकणार असं हे ठिकाण आहे. लांब वर पसरलेला तो समुद्र मनाला एक वेगळच समाधान देतो. एवढेच काय तर आजूबाजूचा परिसर मनाला भारावून टाकणार आहे. वेंगुर्लेपासून अवघ्या 3 कि.मी. वर हा बीच आहे. जर तुम्हाला एकांतात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवायचा असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे. समुद्रा जवळ जाताना सर्वात पहिले तुम्हाला सागरेश्वर मंदिराचे दर्शन होईल. अगदी शांत आणि स्वच्छ असा हा समुद्र आहे. समुद्राच्या परिसरात सुरू वृक्ष पाहायला मिळतील.स्वच्छ आणि नीट समुद्रकिनारा. अस्सल कोकण शैलीतील शिवमंदिर आणि ते वेंगुर्ला शहराजवळ आहे. तसेच या समुद्रावर जास्त गर्दी सुद्धा नसते.

संध्याकाळी म्हणजेच सुमारे तीनच्या नंतर थोडीफार गर्दी होण्यास सुरुवात होते. जर तुम्ही वेंगुर्ला मध्ये राहणार असाल तर संध्याकाळी समुद्रावर जाऊन संध्याकाळचे सुंदर व सुखद असे वातावरण तुम्ही अनुभवू शकता. सकाळचा सूर्योदय व संध्याकाळचा सूर्यास्त मनाला अगदी वेड लावून जातो. येथील स्थानिक लोकही खूप चांगली आहेत. आणि येथे जास्त करून कोकणातील सुप्रसिद्ध भाषा कोकणी/मालवणी बोलली जाते. कधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिलात तर वेंगुर्ला समुद्रकिनारा पाहायला विसरू नका!
राहण्याची सोय :
जर तुम्ही इथे राहायची सोय करत असाल तर तुम्हाला थोडे कठीण जाईल हॉटेल शोधण्यासाठी. तसे तुम्हाला येथे स्थानिक लोकांनी बांधलेले रूम्स भाड्याने मिळतील.
जेवणाची सोय:
तुम्हाला मार्केटमध्ये खूप हॉटेल्स मिळतील तेथे तुम्ही अस्सल मालवणी जेवणाची चव घेऊ शकता.
टीप : जर तुम्ही फोटोशूट किंवा प्रे-वेडिंग शूटसाठी तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी व वेबसिरीजसाठी कोणते समुद्रकिनाऱ्याचे ठिकाण शोधत असाल तर सागरेश्वर बीच सर्वात उत्तम आहे.
बरं मग या समुद्रकिनाऱ्यावर कसे जायचे ?
रस्त्याने :
मुंबई ते वेंगुर्ला : सायन – वाशी – पनवेल – पेण – महाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर –तळेरे - कणकवली – कसाल – कुडाळ –वेंगुर्ला (सागरेश्वर).
पुणे ते वेंगुर्ला (कोल्हापूर- गगनबावडा मार्गे) : पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – गगनबावडा - वैभववाडी - तळेरे - कणकवली - कसाल - कुडाळ - वेंगुर्ला (सागरेश्वर)
पुणे ते वेंगुर्ला (कोल्हापूर राधानगरी मार्गे): पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – राधानगरी – दाजीपूर – फोंडा – कणकवली - कसाल – कुडाळ – वेंगुर्ला (सागरेश्वर).
पुणे ते वेंगुर्ला (ताम्हिणी घाट मार्गे): पुणे – पौंड – मुळशी – ताम्हिणी घाट – माणगाव – महाड – पोलादपूर – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – तळेरे- कसाल – कुडाळ – सागरेश्वर.
मुंबई ते वेंगुर्ला अंतर 500 कि.मी.
पुणे ते वेंगुर्ला अंतर 395 कि.मी.
रेल्वेने:
जवळचे रेल्वे स्टेशन: कुडाळ.
कुडाळ ते सागरेश्वर अंतर 22 कि.मी.
खाली नमूद केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना तुम्ही भेटी देऊ शकता.
1) देवगड कुणकेश्वर मंदिर / देवगड समुद्र /देवबाग
2) सिंधुदुर्ग / मालवण किल्ला
3) तारकर्ली बीच
4) विजयदुर्ग किल्ला
5) शिरोडा बीच
6) निवती बीच
7) सावंतवाडी पॅलेस
8) आंबोली हिल स्टेशन
9) स्कुबा डायव्हिंग सागरी विश्व
10)चोरला घाट
11) त्सुनामी बेट
12)मालवण सागरी अभयारण्य
13) तळाशील तोंडवली बीच
येवा कोकण आपलोच असा🌴❤️
आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नकात.
मला अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करू शकता.
Instagram ID : s_o_n_u_26619
आणि हो youtube ला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.
YouTube channel : sr's_unique_world
आणि हो इथपर्यंतर येण्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार माहिती आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ❤️🥀
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा